आ.सुरेशकुमार जेठलियांवर खुनाचा गुन्हा दाखल

February 23, 2012 10:58 AM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारी

परतुरचे अपक्ष आमदार सुरेश कुमार जेठलिया यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी प्रभाकर चोरघडे यांचा मृत्यू झाला होता. जेठलिया यांच्या जिनिंग प्रेसिंग कंपनीत चोरघडे यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने चौरघडे यांच्या पत्नीने हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने आमदार सुरेशकुमार जेठलिया, त्यांचा मुलगा नितिनकुमार जेठलिया आणि इतर सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

close