मनोर-वाडा दरम्यान उड्डाणपुलाचा काही भाग खचला

February 23, 2012 11:25 AM0 commentsViews: 27

23 फेब्रुवारी

मुंबईतील पालघर येथे मनोर आणि वाडा दरम्यान असलेला उड्डाणपुलाचा काही भाग खचला आहे. 2 महिन्यांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काँक्रीट ठोकळ्यांची वॉल कोसळल्याने हा भराव खचला आहेया पुलावर चढण्यासाठी टाकलेला मुरुम आणि वाळुचा भराव हा एका बाजुने खचला आहे. यामुळे सध्या काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. काँक्रीट ठोकळ्याचा वापर केला तर पुलाचं बांधकाम फार जलद गतीनं होतं.पण या ठोकळ्यांची जोडणी व्यवस्थित न झाल्याने ही घटना घडल्याचं समजतं. अवघ्या 2 महिन्यातंच या पुलाची ही अवस्था झाल्याने या पुलाच्या दोन्ही बाजुंच्या काँक्रीट वॉलची तपासणी पुन्हा नव्याने करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

close