बनावट मतदार ओळखपत्र तयार झाल्याची तक्रार

February 24, 2012 9:31 AM0 commentsViews: 56

24 फेब्रुवारीमहापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बोगस मतदार ओळखपत्रांना पाय फुटले. नाशिकमध्ये आज वोटिंग कार्ड्सविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. यामध्ये निवडणूक आयोगाचा अधिकृत कॉन्ट्रॅक्टर विजय कसबे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यात त्यांना अनेक बोगस वोटिंग कार्ड्स मिळाले आणि काही यंत्रसामुग्री सापडली. . विजय कसबे हा आतिशा इन्फोटेकचा मालक आहे. ही ओळखपत्र बनावट नसून अधिकृत असल्याचं जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केलं आहे. विजय कसबे हा निवडणूक आयोगाचा अधिकृत कॉन्ट्रॅक्टर असल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे. कन्हैया अशोक परदेशी या आतिशा इन्फोटेक कंपनीत काम करणार्‍या व्यक्तीनेचे निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली होती. त्यात 2000 बोगस कार्ड्स बनवल्याचे त्यानं सांगितलं होतं. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. तर ही सगळी मतदार ओळखपत्र खरी आहे असा दावा कसबे यांनी केला आहे.मतदार याद्या जाहीर झाल्या तेव्हापासून बनावट नावं घुसडल्याच्या तक्रारी नाशिकमध्ये करण्यात आल्या होत्या. पण निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्या तक्रारींना केराच्या टोपल्या दाखवल्या. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अडगावजवळ काही बनावट मतदारांना पकडून कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. सटाणा तालुक्यातून या मजुरांना 53 क्रमांकाच्या वॉर्डात मतदान करण्यासाठी आणण्यात आलं होतं. दुसर्‍या वॉर्डांमध्येही वेगळी परिस्थिती नव्हती.

या गोंधळातली कमजोर कडी आता पुढे आली आहे.आणि प्रशासनाला पडताळणी करणं भाग पडलं. विजय कसबेच्या घरावर पोलिसांनी छापा घातला. आणि त्याच्या घरी आढळलेलं सर्व साहित्य सरकारी असल्याचं तहसीलदारांनी स्पष्ट केलं आहे.तरीही काही प्रश्न बाकी आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील बागुल म्हणतात, कलेक्टर कचेरीतले कर्मचारी यात सहभागी आहेत. गीते, सबनीस, जोशी हे कर्मचारी या प्रकरणात सहभागी आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असा आरोप केला.त्र आपल्याकडे व्होटर आयडी बनवण्याचं अधिकृत कॉन्ट्रॅक्ट असल्याचं कसबेचं म्हणणं आहे. या सगळया प्रकारानंतर राज्याचा निवडणूक आयोग कायभूमिका घेतं हे महत्वाचं आहे.

close