आता मिळणार ‘बजेट पिझ्झा’

November 22, 2008 4:41 AM0 commentsViews: 6

22 नोव्हेंबर, मुंबईअमृता दुर्वेमंदीचं सावट सगळीकडे असताना सगळ्यांचे कॉस्ट कटिंगचे प्रयत्न सुरू आहेत. खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं बजेट आखलं जातं. यासाठी लोकांनी हॉटेलिंग कमी केल्याने आता पिझ्झा चेन्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'बजेट' ऑप्शन्स आणले आहेत. पिझ्झा खायचा ठरवलं तर एका पिझ्झाची किंमत असते किमान अडीचशे – तीनशे रुपयांपये. पण आता आपल्याला तीस पस्तीस रुपयांतही बजेट पिझ्झा मिळू शकतो.वाढलेल्या महागाईमुळे लोकांनी बाहेर खाण्याचं प्रमाण कमी केलंय आणि त्याची झळ आता फास्ट फूड जॉइंट्सना बसायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे वाढत्या किंमतींचा फटकाही या रेस्टॉरंट्सना बसतोय. 'आमचा 5 ते 7 टक्के बिझनेस कमी झाला आहे. वस्तूंच्या किंमती वाढल्यायत. इतक्या कमी किंमतीत पिझ्झा देणं कठीण आहे' असं स्मोकिन जोजचे कॉर्पोरेट मॅनेजर मारियो मार्टिन यांनी सांगितलं.त्यामुळेच ग्राहक टिकवण्यासाठी पिझ्झा कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 30 ते 35 रुपयात पिझ्झा देणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. 'या ऑफरमुळे आमचा बिझनेस वाढेल, अशी आम्हाला आशा आहे' अशी अपेक्षा स्मोकिन जोजचे कॉर्पोरेट मॅनेजर मारियो मार्टिन यांनी व्यक्त केली.ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आता सगळ्याच पिझ्झा चेन्सनी असा बजेट पिझ्झा किंवा वेगवेगळ्या ऑफर्स देणं सुरू केलंय. कारण नवा ग्राहक आणण्याचा हा एकच उपाय उरला आहे.

close