हॉकीमध्ये कॅनडाला हरवत भारत फायनलमध्ये

February 23, 2012 12:11 PM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारी

ऑलिम्पिक हॉकी क्वालिफाईंग स्पर्धेत भारताने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने कॅनडाचा पराभव करत फायनलमध्येही धडक मारली आहे. सिंगापूर, इटली आणि फ्रान्सचा धुव्वा उडवल्यानंतर आज भारताने कॅनडाचा 3-2 असा पराभव केला. कॅनडाविरुध्द गोलचं खातं उघडलं ते शिवेंद्र सिंगने. आणि त्यानंतर संदीप सिंगने खेळाची सूत्रं आपल्या हातात घेतली. संदीप सिंगने सलग दोन गोल मारत भारताला शानदार विजय मिळवून दिला. कॅनडाने 2 गोल करत चांगली लढत दिली. पण भारतीय टीमच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या स्पर्धेत भारतानं 4 मॅचमध्ये तब्बल 32 गोल केले आहेत.

close