इव्हीएम मशीनची तपासणी करण्याची उमेदवारांची मागणी

February 24, 2012 10:16 AM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन मध्ये फेरफार झाल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे. या मागणीसाठीच पुण्यामध्ये आंदोलन पुकारण्यात आलं. पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय उमेदवार एक त्र आले होते. यावेळी त्यांनी इव्हीएम मशीन्सची तपासणी केली जावी अशी मागणी केली. अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये फेरफार झाली होती याची तपासणी करतानाच फेरमतदानाचीही मागणी करण्यात आली.

close