ठाण्यात बालमजुराला अमानुष मारहाण

February 24, 2012 11:12 AM0 commentsViews: 4

24 फेब्रुवारी

ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड परिसरात बालमजुराला अमानुष मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. या भागातील स्टेटस या कापड दुकानात राज गाला हा 17 वर्षांचा मुलगा कामाला होता. त्यानं मालकाकडून 20 हजार रुपये व्याजानं घेतले होते. त्याच्या पगारातून तै पैसै कापलेही जात होते. मात्र दुकान मालकाने राजवर चोरीचा आळ घेत जबर मारहाण केल्याचा आरोप या मुलाने केला आहे. वायरच्या साह्याने जबर मारहाण केल्यामुळे राजच्या पाठीवर, खांद्यावर वळ पडले आहेत. याप्रकरणी राजने मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण अजूनही त्याची तक्रार घेतलेली नाही.

close