पुण्यात कोर्टाच्या परिसरात गोळीबार

February 23, 2012 1:59 PM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारी

अण्णा बांदल हत्या प्रकरणातल्या साक्षीदाराच्या मित्रावर पुण्यात फायरिंग झालं. अण्णा बांदलची हत्या 2008 मध्ये झाली होती. त्यासंदर्भात पुणे कोर्टात केस सुरू आहे. बांदल यांचे काही समर्थक कोर्टाचा निर्णय ऐकण्यासाठी हजर होते. यावेळी कामगार पुतळ्याजवळ साक्षीदारांच्या मित्रावर अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केलं आणि फरार झाले. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. त्याला ससुन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या गोळीबाराचे कारण अजून समजू शकले नाही. याबाबत पोलीस तपास करत आहे.

close