महिलेनं नवजात बाळाला 2 लाखांना विकले

February 24, 2012 11:25 AM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी

उल्हासनगरमध्ये एका महिलेनं सहा दिवसांचं बाळ विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गरिबीमुळे कंटाळलेल्या एका दाम्पत्यानं आपलं सहा दिवसांचं बाळ विकलं. याकामी त्यांची मदत केली विजया सोनावणे या महिलेनं. विजयाने यापूर्वीही अशापद्धतीने तान्ही बाळं विकल्याचे पोलीस तपासात पुढे आलं आहे. गरिबीला कंटाळलेल्या बबली आणि प्रधान कनोजिया या दाम्पत्याला विजयानंच बाळ विकण्याचा सल्ला दिला. या कामात विजयासोबतच रत्ना उबाळेनही मदत केली. एकूण 2 लाख 30 हजार रुपयात बाळाला विकण्यात आलं. याप्रकरणात कनोजिया दाम्पत्य, विजया सोनावणे आणि रत्ना उबाळे या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

close