कुडनकुलम प्रकल्पविरोधाला अमेरिकेतून पाठिंबा – पंतप्रधान

February 24, 2012 11:36 AM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी

तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा मिळत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. विशेषतः अमेरिकेतल्या एनजीओचा यात हात आहे . भारतातल्या ऊर्जा क्षेत्रात वाढ व्हावी, अशी काही एनजीओची इच्छा नाही. त्यांना अमेरिकेतून निधी मिळतोय असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या निधींचा स्रोत आणि ठिकाणाचा सरकारने तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

close