हिंगोलीत रथोत्सवामध्ये अपघात ; एकाचा मृत्यू

February 24, 2012 11:46 AM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी

हिंगोली जिल्हातील औंढा नागनाथ इथं रथोत्सवादरम्यान रथाचं चाक निखळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. महाशिवरात्री-दरम्यान नागनाथ मंदिरात रथोस्तवाचं आयोजन केल जातं. या उत्सावासाठी देशभरातून भाविक येतात. रथ ओढत असताना रथाच्या चाकामधील आख तुटल्यामुळे हा अपघात झाला. रथाच्या समोरील बाजूस बसलेले पुजारी सतीश पथक हे खाली पडले आणि त्यांच्या अंगावरुन रथाचं चाक गेलं. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर जखमी भाविकांना औंढ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close