धोणी-वीरुने मारली पत्रकार परिषदेला दांडी

February 24, 2012 12:39 PM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी

भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात सुरु झालेली तू-तू-मैं-मैं काही थांबायचं नाव घेईना. धोणी आणि सेहवाग यांच्यात बेबनाव असल्याचं बोललं जातं आहे. पण आज दोघांपैकी एकानेही मीडियाशी संवाद साधला नाही. दोघं आज एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतील असा अंदाज होता. पण टीमचे मॅनेजर जी एस वालिया एकटेच मीडियाला सामोरे गेले. हे प्रकरण फारसं गंभीर नसल्याचे वालिया यांनी मीडियाला सांगितलं. शिवाय मीडिया रिपोर्ट एकतर्फी आणि पराचा कावळा करणारे आहेत असंही त्यांनी सांगितलं.

close