कोल्हापुरात टोल धाड ?

February 24, 2012 1:12 PM0 commentsViews: 8

24 फेब्रुवारी

प्रताप नाईक, कोल्हापूर

कोल्हापुरात आयआरबी च्या टोलनाक्यांना होणारा विरोध हा अजूनही कायम असला. तरी आता निवडणुका संपल्यानंतर टोल वसुलीच्या प्रक्रियेला सुरवात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने टोलला तात्पुरती स्थगीती दिली होती. पण आता कोल्हापुरात पुन्हा संघर्षाची चिन्हं दिसत आहेत.

कोल्हापूरमध्ये आयआरबी (IRB) च्या टोलनाक्यांच्या विरोधात नागरिकांनी विशाल आंदोलन करत आपली नाराजी तर नोंदवली होती. पण आता पुन्हा एकदा नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागणार असचं दिसत आहे. नागरिकांचा संताप लक्षात घेता सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टोलला तात्पूरती स्थगिती दिली. पण निवडणुका संपताच आयआरबीच्या टोल नाक्यांवर कर्मचार्‍यांची वर्दळ सुरु झाली आहे. आणि त्यामुळे कोल्हापूरकर चांगलेच संतापले आहे.

देशात शहरातअंर्गत रस्त्यांना कुठेच टोल नाही मग आम्ही का टोल द्यायचा असा प्रश्न कोल्हापूरकरांचा आहे. राज्य सरकारन हा टोल कायस्वरुपी रद्द करुन टोल रुपी भुत कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर उतरवावं अशी मागणी होतीय.

टोल नाके जर सुरु करायचे असतील तर आयआरबी ला राज्य सरकारला 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. आणि त्यासंदर्भातआयआरबीनं पावलंही उचलली आहे. तर याचसंदर्भात सुकाणू समितीची बैठकही मंत्रालयात पार पडली. त्यामुळे राज्य सरकरार काही दिवसात याविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे. पण जर असं घडलं तर आयआरबी कंपनी आणि सरकारला पुन्हा एक नागरिकांच्या संतापाची धग सोसावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

close