ऑस्ट्रेलियावर लंकेचा शानदार विजय

February 24, 2012 2:22 PM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी

क्रिकेट ट्रायसीरिजमध्ये श्रीलंकेने आज ऑस्ट्रेलियन टीमचा तीन विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने समोर ठेवलेलं 280 रन्सचं आव्हान त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ओपनर महेला जयवर्धनेने 85 आणि चंडिमलने 80 रन करत विजयात मोलाची भूमिका बजावली. दोघं पिचवर होते तोपर्यंत श्रीलंकेचा विजय निश्चितच होता. पण पुढच्या तीन विकेट झटपट गेल्यामुळे मॅचची रंगत वाढली. अखेर थिसारा परेराने अकरा बॉलमध्ये 21 रन करत लंकन टीमला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन टीमने 280 रन केले ते पीटर फॉरेस्टच्या 104 रन्सच्या जोरावर.. या विजयासह त्यांनी पॉइंट टेबलमध्येही अव्वल स्थानावर झेप घेतली. भारतीय टीमचे आव्हान मात्र त्यामुळे कठीण झालं आहे. फायनल गाठण्यासाठी भारताला उरलेल्या दोन्ही मॅच मोठ्या फरकाने जिंकाव्या लागतील.

close