‘चक दे इंडिया…’

February 24, 2012 3:02 PM0 commentsViews: 2

दिग्विजय सिंग देव, मुंबई

24 फेब्रुवारी

एकीकडे टीम इंडिया क्रिकेटमध्ये पराभवाचे इमले रचत असतांना टीम हॉकीने कौतुकास्पद कामगिरी करुन दाखवली आहे. टीम हॉकीने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये आज भारताने पोलंडचा 4-2 असा पराभव केला. या स्पर्धेतला भारताचा हा सलग पाचवा विजय ठरला आहे.आता रविवारी फायनलमध्ये भारताची गाठ फ्रान्सशी पडेल. आणि लंडन ऑलिम्पिकचं तिकिट मिळवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावीच लागेल.पुरुषांच्या हॉकी टीमसाठी आतापर्यंत सगळं मनासारखं घडलं आहे. टीम बर्‍यापैकी नवखी आहे. त्यामुळे मॅचदरम्यान दडपणाचा मुकबला या नव्या खेळाडूंना करता येईल का अशी काळजी वाटत होती. पण कॅनडा सारख्या कसलेल्या टीमला नमवल्यानंतर कोच मायकेल नॉब्स यांनाही टीमबद्दल विश्वास वाटतोय. पण आता शेवटच्या लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये आज भारताने पोलंडचा 4-2 असा पराभव केला. या स्पर्धेतला भारताचा हा सलग पाचवा विजय ठरला आहे. पण हा विजय भारतासाठी सोपा नव्हता. जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या पोलंडनं भारताला चांगली झुंज दिली. पण जबरदस्त फॉर्मात असलेल्या संदीप सिंगनं 2 गोल करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. आता रविवारी फायनलमध्ये भारताची गाठ फ्रान्सशी पडेल. आणि लंडन ऑलिम्पिकचं तिकिट मिळवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावीच लागेल. दरम्यान, भारताच्या महिला टीमनंही फायनलमध्येल धडक मारली आहे.

close