पहिल्या संत साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

February 25, 2012 11:47 AM0 commentsViews: 19

25 फेब्रुवारी

नाशिकमध्ये आजपासून पहिल्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. सा संमेलनासाठी संत निवृत्ती नाथ महाराज नगरी उभारण्यात आली आहे. शहरात निघालेल्या दिंडी सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गावितही सहभागी झाले होते. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झालं. वारकरी परिषदेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त संतसाहित्य, वारकरी सांप्रदाय अशा विषयांवर विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आलं आहे.

close