रिक्षा भाडे 16 रुपये करण्याची युनियनची मागणी

February 24, 2012 3:23 PM0 commentsViews: 1

24 फेब्रुवारी

मुंबईच्या वाहतुकीत तिसरी शक्ती ऑटो रिक्षाचा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे रिक्षाचं किमान भाडं वाढवा, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी केली आहे. रिक्षा भाड्यात किमान 5 रूपये भाडेवाढ करा, सध्या रिक्षाचं भाडं 11 रुपये आहे, ते 16 रुपये व्हावे अशी त्यांची मागणी आहे, येत्या महिनाभरात निर्णय न घेतल्यास 28 मार्च पासून मुंबईतले साडेसात लाख रिक्षाचालक संपावर जातील असा इशारा शरद राव यांनी दिला आहे.

close