औरंगाबादचं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू

November 22, 2008 4:51 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर, औरंगाबादसंजय वरकडऔरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलयं. हे विमानतळ मराठवाड्याच्या आथिर्क प्रगतीत मोठी भूमिका बजावेल, अशी सगळ्यांनाच आशा आहे.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी औरंगाबादच्या विमानतळाचं उद्घाटन केलं. केंद्रीय विमान वाहतुक मंत्री प्रप्फुल पटेल, ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, राज्याचे सहकार मंत्री पतंगराव कदम, पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील अशी बडी नेतेमंडळी या कार्यक्रमाल हजर होती. खासदार विजय दर्डा, आमदार राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे हेही या कार्यक्रमाला आले होते. 'आजचा दिवस औरंगाबादच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा आहे. मराठवाड्याचं स्पन्न पूर्ण होतेंय आगामी काळात इथं परकीय गुंतवणूक वाढेल' असं मुख्यमंत्री म्हणाले.या कार्यक्रमात नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या विमानतळ सुविधा आणि विमानसेवेची विस्तारानं माहिती दिली 'आनंद दोन दृष्टीनं आहे. एक तर आमच्याच काळात भूमिपूजन झालं आणि आमच्याच काळात उदघाटनही होत आहे. नांदेड लातूरची विमानसेवा सुरू झाली. अशा छोट्या जिल्ह्यांत सेवा सुरु होत आहे. महाराष्टात आता सोलापूरला विमानसेवा सुरू होईल. नागपूर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद अशा आठ ठिकाणी विमानसेवा सुरू होत आहे' असं ते म्हणाले.या विमानतळावरून जेद्दा साठी खास विमान सुरू करण्यात आलंय. या पहिल्या विमानानं जाणार्‍या हाज यात्रेकरूंना सगळ्यांनी प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

close