पत्रकारांवर हल्ल्यासंदर्भात बाजू मांडणार – अजित पवार

February 25, 2012 11:52 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारी

पत्रकारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यासंदर्भात प्रेस कौन्सिलने राज्य सरकार बरखास्त का करु नये, अशी नोटीस राज्य सरकारला बजावली होती. या नोटिसीची गंभीर दखल राज्यकर्त्यांनी घेतली आहे. सोमवारी राज्य सरकारची बाजू हायकोर्टात मांडणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. परंतु कोर्टात सरकाची बाजू मांडण्यासाठी ऍडव्हाकेट जनरलची आवश्यकता असते आणि सध्या हे पद रिक्त आहे. लवकरच या पदावर योग्य व्यक्तीची निवड करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितले आहे.

close