पुणे पालिकेचं 3 हजार कोटींचं बजेट सादर

February 25, 2012 12:05 PM0 commentsViews: 4

25 फेब्रुवारी

पुणे महानगरपलिकेचं 2012 -13 साठीचे बजेट पालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी स्थायी समितीमध्ये सादर केलं. एकुण 3 हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांच्या या बजेटवर आता स्थायी समितीमध्ये चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर येत्या 4 मार्चला स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर सर्वसाधारण सभेपुढे सादर करतील. यामध्ये पाणीपुरवठ्यासाठी एकूण 412 कोटी, मलनिस्सःरणासाठी 136.81 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खास तरतूद करण्यात आलीय आणि कचरा डंपिंग ग्राऊंडसाठी नवीन जागा घेण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

close