कृपांचे चिरंजीव पण कोट्याधिश ; कोर्टाची करडी नजर

February 24, 2012 6:07 PM0 commentsViews: 7

24 फेब्रुवारी

कृपाशंकर सिंह यांच्यानंतर आता वेळ आली आहे ती त्यांच्या पुत्राची. कृपाशंकर सिंह यांचा मुलगा संजय सिंह जेमतेम 30 वर्षांचाच आहे. पण आजच्या घडीला त्याच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता आहे. याचीही मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे. गेल्या पाच ते सात वर्षांत त्याच्या नावावर ही मालमत्ता झाली आहे. कृपाशंकर सिंह यांचा मुलगा संजय सिंग याने पायलटचं शिक्षण घेतलं आहे. पण सध्या तो बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवसाय करत असल्याचे म्हटलं जातं आहे.

संजय सिंहची मालमत्ता

बांद्रा: कार्टर रोड भागात 'तरंग' बंगला; बंगल्याची सध्याची किंमत रु. 50 कोटीबांद्रा-कुर्ला काँप्लेक्स: प्लॅटिनम मॉलमध्ये 22,500 स्क्वे. फू. जागा; जागेची किंमत अंदाजे रु. 80 कोटीबीकेसी: ट्रेड लिंक इमारतीत 12 हजार स्क्वे. फू. जागा; अंदाजे किंमत रु. 42 कोटी भांडूप: एचडीआयएल कॉम्प्लेक्समध्ये काही गाळे; अंदाजे किंमत रु. 4 कोटी सांताक्रूझ: 959 स्क्वेअर यार्डचा मोकळा प्लॉटविलेपार्ले: ज्युपिटर या बिल्डिंगमध्ये 1900 स्क्वे. फू टाचे घर; अंदाजे किंमत रु. दीड कोटी

close