रायगडमध्ये भीषण दरोडा ; 14 वर्षाची मुलगी ठार

February 25, 2012 12:16 PM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारी

रायगड जिल्हातील बिरवडी इथं काल मध्यरात्री भीषण दरोडा पडला. गावातील सुतार यांच्या घरावर पहाटे एक वाजताच्या 5 ते 6 दरोडेखोरांनी दरोडा घातला. कुटंुबीयांनी विरोध केल्यामुळे दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात 14 वर्षाची शिवानी सुतार जागीच ठार झाली, तर कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईतील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. महाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेनं गावावर शोककळा पसरली. घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी गोवा- मुंबई हायवे काही वेळ रोखून धरला होता.

close