नाशिकमध्ये पुणे पॅटर्न ?

February 25, 2012 1:54 PM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारी

नाशिकमध्ये त्रिशंकू महापालिका अस्तित्वात आल्यामुळे महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये महापौर महायुतीचाच होणार असा दावा केला. पण त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागू शकते. त्यामुळे आता नाशिकमध्ये पुन्हा सेना-भाजप-राष्ट्रवादी असा पुणे पॅटर्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाशिकच्या महापालिकेत मनसे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मनसेचा पहिला महापौर नाशिकचा असेल, असं राज ठाकरेंनी ताबडतोब जाहीर केलं. त्यासाठी भाजपशी पडद्यामागे चर्चाही सुरू झाल्या. पण त्यामुळे सतर्क झालेल्या राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनं चंग बांधला की कोणत्याही परिस्थितीत मनसेला सत्तेपासून दूर ठेवायचं. मुंबईत भाजप आणि सेनेच्या नेत्यांचं मातोश्रीवर मनोमीलन होताच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं की नाशिकचा महापौर महायुतीचाच असेल. पण भाजप आणि शिवसेना एकत्र आले तरी बहुमताचा आकडा गाठता येत नाही.

बहुमतासाठी 63 चा आकडा हवा आहे. शिवसेना, भाजप आणि रिपाइं एकत्र आले तरी 36 पर्यंत पोचता येतंय. त्यामुळे जर महायुतीला आपला महापौर बसवायचा असेल तर त्यांना राष्ट्रवादीच्या 20 आणि 6 अपक्षांची गरज आहे

छगन भुजबळ यांनी आधीच रामदास आठवलेंच्या मार्फत महायुतीला पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे शरद पवार जरी पुणे पॅटर्नच्या विरोधात असले. तरी मनसेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नाशिकमध्ये सेना-भाजप-रिपाइं-राष्ट्रवादी अशी मोठी मोट बांधली जाऊ शकते.

नाशिकमध्ये त्रिशंकू

बहुमत = 63शिवसेना + भाजप + रिपाइं = 36 महायुती (36) + राष्ट्रवादी (20) + अपक्ष (6) = 62बहुमत = 63

close