चेंबुरमध्ये ‘मंकी मॅन’च्या अफवेनं रात्र वैर्‍याची

February 24, 2012 5:37 PM0 commentsViews: 27

24 फेब्रुवारी

मुंबईतल्या चेंबूर परिसरातील नागरिक सध्या हैराण झालेत ते मंकी मॅनच्या त्रासानं. रोज रात्री मंकी मॅन इथल्या घरांवरुन पळत जात असल्याच्या अफवेनं इथल्या नागरीकांची झोप उडाली आहे. रात्री सगळे नागरिक रस्त्यावर येऊन आपल्या परिसरीची राखण करतात. या मंकीमॅनला कोणीही पाहिलेलं नाही पण तो पळताना घरांवरुन पायांचा मोठा आवाज येतो असं लोक सांगत आहे. तसेच तो चोरी करतो, माणसांना मारतो, असंही सांगतात. पण तसा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या सर्व अफवा आहेत, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अशा अफवा पसरवणार्‍या दोन लोकांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर अशा अफवांमुळे दोन जणांना लोकांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.

close