मतभेदामुळे भाजपचे शिलेदार ‘गडा’वर

February 25, 2012 9:39 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपले फोन बाळासाहेबांपर्यंत पोहोचत नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा विसंवाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी आज मुंडे, खडसे, मुनगंटीवार आणि तावडे या भाजपच्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली.

शिवसेना आणि भाजप युतीच्या संसारात आता नवा वाद रंगतोय. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी सामनातून होणार्‍या टीकेवर आणि बाळासाहेबांशी होत नसलेल्या संवादाबद्दल नाराजी व्यक्त करत युतीमध्ये आलबेल नाही याचे संकेत दिले. त्यामुळे मातोश्रीच्या जवळचे मानले जाणारे मुंडे भाजपच्या नेत्यांसोबत बाळासाहेबांच्या भेटीला आले. आजची बैठक एक स्नेहभेट होती असं जरी दोन्ही कडच्या नेत्यांनी सांगितलं असलं तरी हा विषय आजच्या बैठकीत चर्चीला गेलाच आणि त्यावर बाळासाहेब आणि गडकरी भेटीचा तोडगा निघाला. महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे याची जाणीव दोन्हीकडच्या नेत्यांना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुंबईत नसतानाही भाजपची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द बाळासाहेबांनीच पुढाकार घेतला.

close