पाकच्या दोन खासदारांनी घेतले साईदर्शन

February 25, 2012 2:29 PM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारी

पाकिस्तानच्या दोन खासदारांनी काल शिर्डीला भेट देऊन साई समाधीचे दर्शन घेतले. खासदार गुल मोहम्मद खान जखरानी आणि रमेशलाल मोटवानी यांनी काल साई समाधीचं दर्शन घेतलं आणि दुपारची आरतीही केली. दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत आणि शांतता नांदावी अशी बाबांना प्रार्थना केल्याचे या खासदारांनी सांगितले.

close