पुण्यात ‘मीटर फास्ट’ रिक्षाचालकांचा संप

February 25, 2012 10:16 AM0 commentsViews: 31

25 फेब्रवारी

'पुणे तिथे काय उणे' असं बिरुद असलेल्या शहरात पीएमटीनं फिरणे जरा जिकरीचे काम.पण रिक्षाने फिरणे म्हणजे 'रिक्षा पेक्षा मीटर फास्ट' अशी अवस्था होऊन बसली आहे. रिक्षाचालकांच्या या मुजोरी कारभाराला चाप लावण्यासाठी इलेक्ट्रानिक्स मीटर सक्तीचे करण्यात आले. पण पुणेकर रिक्षाचालकांनी संपाचे हत्यार उपसत दुपारी 12 ते 5 पर्यंत ऑटोरिक्षा बंद ठेवल्या आहेत. इलेक्ट्रानिक्स मीटर सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांनी हा संप पुकारला आहे. बाबा आढाव यांची रिक्षा पंचायत बंदमध्ये सहभागी झाली आहे. जवळपास 50 हजार ऑटोरिक्षा बंद आहेत. रिक्षा चालकांच्या या आंदोलनाचा, प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. तिकडे पीएमटी बसेस प्रवाशानी खच्चाखच भरुन गेल्या होत्या. यामुळे अनेकांना पीएमटीसाठी बस स्थानकावर ताटकाळत उभे राहावे लागले.

close