कृपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना

February 25, 2012 4:50 PM0 commentsViews: 6

25 फेब्रुवारी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यासाठी स्पेशल इनव्हेस्टिगेटिव्ह टीमची स्थापना करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. क्राईम ब्रँचच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त राजवर्धन हे या एसआयटीचे प्रमुख असतील. त्यांच्या मदतीला आठ अधिकारी आणि चार कर्मचारी आहेत. ही एसआयटी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा, क्राईम ब्रँच तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेल्या अधिकार्‍यांची नियुक्ती एसआयटीमध्ये करण्यात आली आहे.

एवढी संपत्ती आली कुठून?

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे ?विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल (HDIL)च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकानं- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 250 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा – पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं दुकान

close