त्या 1 कोटी मागे मुख्यमंत्र्यांचा जवळचा मंत्री – गडकरी

February 26, 2012 10:09 AM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

ऐन निवडणुकांच्या रणधुमाळी अमरावतीत एका आलिशान कारमध्ये सापडलेले एक कोटी रूपये सापडले होते. हे एक कोटी रूपये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळच्या एका मंत्र्यांने नागपुरातील कॉट्रक्टर्सकडून गोळा केलेले पैसे आहेत असा गंभीर आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला. हे पैसे नागपुरात वापरण्यासाठी आले होते. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने पैशाच्या जोरावर मतदाराना विकत घेण्याचा प्रयत्न केला असा आरोपही गडकरींनी केला आहे. काँग्रेसने जर हा पक्षाचा निधी आहे असं सांगत असले तर त्यांनी बँकेची स्लिप दाखवावी पण तसे काही ते करत नाही. यासाठी याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ही गडकरी यांनी केली. अमरावतीमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते. या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली. तर राष्ट्रपती पुत्र शेखावत यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती.

close