टीम इंडियात ‘ऑल ईज वेल’

February 25, 2012 10:34 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारी

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी आणि वीरेंद्र सेहवागमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर बीसीसीआयनं पुढचं पाऊल टाकत दोघांमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे प्रयत्न सकारात्मक दिसत आहे. मतभेद मिटवण्यासाठी धोणी समोर आला आणि आता आमच्या दोघांमध्ये कोणतीही फूट नाही असं स्पष्टीकरण खुद्द धोणीने दिल आहे. टीममधील सीनिअर खेळाडू स्लो फिल्डर आहेत असं मत धोणीनं व्यक्त केलं होतं. त्यामुळे धोणी आणि सेहवागमध्ये वाक्‌युद्ध रंगलं होतं. तसेच धोणीने आमलात आणलेल्या रोटेशन पद्धतीवर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती.

संबंधित बातम्या

धोणी,सेहवागमध्ये तू-तू मैं-मैं

close