टोलधाडविरोधात आता अण्णांचा लढा

February 26, 2012 10:24 AM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

जनलोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण ते दिल्ली मैदान दणाणून सोडले. अण्णांच्या आंदोलनात देशासह विदेशातून लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. अण्णांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागली. आता अण्णांनी टोलधाडाविरोधात मोहिम उघडणार आहे. वारंवार इशारे देऊनही राज्यात टोलधाड सुरू असल्याने अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार केला आहे. यासंदर्भात अण्णा हजारे उद्या राळेगणमध्ये एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला बंडातात्या कराडकर तसेच टोलवसुली विरोेधात लढणार्‍या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत टोलविरोधातील आंदोलनाची दिशा अण्णा ठरवणार असल्याचं समजत आहे.

close