विरारमध्ये भरदिवसा इस्टेट एजंटची गोळ्या घालून हत्या

February 26, 2012 1:34 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी

ठाणे जिल्ह्यातल्या विरारमध्ये काल भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रेमकांत झा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ते इस्टेट एजंट होते. विरार पूर्वेकडच्या फुलपाडा भागात शुक्रवारी झा गाडीवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रेमकांत झा हे भ्रष्टाचार आणि अत्याचारविरोधी समितीचे सदस्यही होते. पण त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

close