मायकल जॅक्सननं मुस्लीम धर्म स्वीकारला

November 22, 2008 5:10 AM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबरपॉप सम्राट मायकल जॅक्सन यानं मुस्लीम धर्म स्विकारल्याचं सांगण्यात येतंय. 'द सन' या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. मायकलचं नवीन नाव मिखाईल ठेवण्यात आलंय. मिखाईल म्हणजे प्रेषितांचा देवदूत. लॉस एजींलीसमध्ये मायकलच्या मित्राच्या घरी, हा धर्मातरांचा कार्यक्रम पार पडल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. जॅक्सनच्या मित्र असलेल्या डेवीस व्हॉर्नस आणि फिलीप बाबूल यांच्यामुळे प्रभावीत होवून मायकेलन मुस्लीम धर्म स्विकारला असल्याचं सांगण्यात येत आहे.

close