मराठी साहित्य आता एका क्लिकवर !

February 26, 2012 1:44 PM0 commentsViews: 44

26 फेब्रुवारी

विकिपीडियाने मराठी दिनाचे औचित्य साधून विकीस्त्रोत ही मराठी साहित्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटमुळे एका क्लिकवर मराठी साहित्य जगभरातल्या मराठीजनांसाठी उपलब्ध होणार आहे.

आता फक्त एका क्लिकवर मराठीतील अभिजात साहित्य जिज्ञासूंना उपलब्ध होणार आहे. 27 फेब्रुवारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाचं निमित्त साधत विकिपिडियाने मराठी वेबसाईट विकीस्रोतची सुरूवात केलीय. सुप्रसिध्द अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते विकीस्रोतचं पुण्यात लॉंचिंग केलं. यावेळी त्यांनी विकिपीडियाचे धोकेही सांगितले.विकिपीडिया जगभरात लोकप्रिय आहे. इंग्रजीशिवाय इतर अनेक भाषात विकिपीडियानं समृध्द ग्रंथभंडार उपलब्ध करून दिलं आहे. मराठी साहित्य जगभरात पोहचवण्यासाठी विकिपीडियानं उचललेलं पाऊल मराठी भाषा चार पावलं पुढे नेणारं आहे.

close