सामाजिक कार्यकर्त्या बनल्या नगरसेविका !

February 26, 2012 1:55 PM0 commentsViews: 6

प्राची कुलकर्णी, पुणे

26 फेब्रुवारी

पुण्याच्या सभागृहाचे कामकाज खर्‍या अर्थाने यंदा महिला चालवणार आहेत. कारण यंदा 152 नगरसेवकांच्या सभागृहामध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त संख्या महिलांची असणार आहे. यातल्याच एक आहेत माधुरी सहस्त्रबुद्धे…सामाजिक कार्यकर्त्या असणार्‍या माधुरीताई यंदा पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवणार आहेत.

माधुरीताईंच्या घरी वर्षानुवर्ष पिठांच्या गिरणीचा व्यवसाय..कुटुंबीयांच्या मदतीने याची व्याप्ती त्यांनी आणखी वाढवली आणि हाच व्यवसाय सकस या ब्रॅण्डनावाने प्रसिध्द झाला. एकीकडे माधुरीताईंनी एमएसडब्ल्यु आणि पत्रकारीतेची डिग्रीही मिळवली. त्यावेळी केलेला अभ्यास त्यांना स्वस्थ बसु देत नव्हता. यातूनच सुरुवात झाली बालरंजन केंद्राला..

सकसचा व्यवसाय आणि एकीकडे बालरंजन केंद्रानेही 25 वर्ष पूर्ण केली. त्यातच संधी चालुन आली ती भाजपकडून निवडणुकीला उभं राहण्याची. आणि माधुरीताई निवडूनही आल्या.. यंदा पहिल्यांदाच महापालिकेत पाय ठेवणार्‍या माधुरीताईंचा नागरिकांसाठीचा अजेंडाही तयार आहे. समाजकार्य म्हणजे फक्त निवृत्त झाल्यानंतरचा विरंगुळा असं पुर्वीचं चित्र असल्याचं माधुरीताई सांगतात.पण हेच चित्र बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळेच आता मिळालेल्या संधीचं सोनं करायची त्यांची इच्छा आहे.

close