वडिलांचे निधन झाले, पण अर्चनाने 12 चा पेपर दिला

February 26, 2012 2:40 PM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

वडिलांच्या निधनाचा धक्का पचवूनसुद्धा एका धाडसी मुलीनं आपला 12 वीचा पेपर दिला. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या अर्चना माळी हिच्या धाडसाने धुळेकर निशब्द झाले आहे. अर्चनाची 12 वीची परीक्षा सुरू असतानाच शेतकरी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यांच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. घरचा कर्तापुरष गेल्यामुळे कुटुंबावर एकच आभाळ कोसळलं. वडिलांनी मुलीनं मोठ शिकावं,मोठ व्हावं आणि तिने शिक्षिका बनवा असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. वडिल्यांच्या जाण्याचं दुख पचवत अर्चनाने वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनावर दगड ठेऊन अभ्यास सुरुच ठेवला. बारावीची परीक्षा अजून सुरु आहे. अर्चना जिद्दीने अभ्यास करत पेपर सोडतं आहे. अर्चनाचा भाऊ दहावीला आहे. बहिणीकडून प्रेरणा घेऊन तोही परीक्षेची तयारी करतोय. अर्चनाची जिद्द पाहुन धुळेकर भारवून गेला आहे. आज गावातला प्रत्येक जण तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचं वचन देत आहे. अशा या धाडसी अर्जनाला आयबीएन लोकमतचा सलाम आणि बारावीच्या परीक्षेला शुभेच्छा !

close