नदीजोडणी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

February 27, 2012 10:02 AM0 commentsViews: 3

27 फेब्रुवारी

नद्या जोडणी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दिला आहे. केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला हा प्रकल्प अंमलात आणण्याची सूचना केली आहे. या प्रकरणी कोर्टाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत अर्थ मंत्रालय, जलसंपदा, प्लॅनिंग कमिशन, एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समावेश असणार आहे. एनडीए सरकारच्या काळापासून हा प्रकल्प चर्चेत आहे. वाजपेयी सरकारने यासाठी विशेष कृती दलाची स्थापना केली होती. त्यावेळचे केंद्रीय पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू या विशेष कृती दलाचे अध्यक्ष होते.

close