उद्या बँक आणि कामगार संघटनचे संप

February 27, 2012 3:50 PM0 commentsViews: 70

27 फेब्रुवारी

उद्या कामगार संघटना, सहकारी संस्था आणि बँकांच्या सात प्रमुख संघटनांनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. त्यामुळे हा संप एकप्रकारे महासंपच असणार आहे. वाढती महागाई,बेरोजगारी खासगीकरणास विरोध, सामाजिक सुरक्षा निधीची मागणी, रोजगार निर्मिताला चालन, कंत्राटी पद्धत मोडीत काढावी, बोनस आणि ग्रॅज्युइटीमध्ये वाढ करावी आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत आहे. या देशव्यापी संपाला महापालिका आणि मंत्रालयातील संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी या संघटना संपात सक्रीय सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मुंबईतल्या अत्यावश्यक सेवांसह महापालिका आणि मंत्रालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. कामगारांच्या या संपामध्ये सीटू, आयटक, इंटक यांच्यासह सर्व कामगार संघटना,प्राध्यापक, बँक,विमा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी,घरकामगार, फेरीवाले, रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत. या संपाला शिवसेनेनं सक्रीय पाठिंबा दिला असून त्यांच्या भारतीय कामगार सेना महासंघाशी आणि स्थानिय लोकधिकार समितीशी संलग्न सर्व संघटना सहभागी होत आहेत.

close