त्या 1 कोटीबद्दल पुरावे असल्यास पोलिसांकडे द्या – ठाकरे

February 27, 2012 12:01 PM0 commentsViews: 2

27 फेब्रुवारी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींचे आरोप राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी पोलिसांना ते द्यावेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावला. यवतमाळमध्ये ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. अमरावतीत सापडलेले 1 कोटी रुपये हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याजवळच्या एका मंत्र्याने कंत्राटदारांकडून गोळा केल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी काल केला होता. तसेच काँग्रेसचा हा पक्षनिधी असेल तर त्यांनी बँकेची स्लिप दाखवावी असं आव्हान केले होतं. आज माणिकराव ठाकरे यांनी प्रतिउत्तर देत सरळ आमच्याविरोधातील पुरावे असतील तर ते पोलसिसांत द्या असा टोला लगावला.

close