आशियाई कपसाठी सचिन इन,सेहवाग आऊट

February 29, 2012 9:30 AM0 commentsViews: 1

29 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात येत असलेल्या अपयशामुळे टीम इंडियाच्या सिनिअर्स खेळाडूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी निवृत्ती घ्यावी अशा चर्चांना पण जोर चढला होता. पण आज आशियाई कप 2012 साठी सचिन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. तर सेहवागला डच्चू देण्यात आला आहे. मार्च महिन्यात आशियाई कप स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि यासाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वन डे टीममध्ये कायम ठेवण्यात आलं आहे. पण वीरेंद्र सेहवागला मात्र टीमबाहेर बसवण्यात आलं आहे. सध्या सरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सेहवाग सपशेल फ्लॉप ठरला. याशिवाय फास्ट बॉलर झहीर खान आणि उमेश यादव यांनाही संधी देण्यात आलेली नाही. युसुफ पठाणनं मात्र वन डे टीममध्ये कमबॅक केलं आहे. अशी असेल भारतीय टीममहेंद्रसिंग धोणी, गौतम गंभीर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, विनय कुमार, राहुल शर्मा,युसुफ पठाण, इरफान पठाण, अशोक दिंडा आणि सुरेश रैना

close