मुंबईतल्या गिरण्यांचे अवशेष पाडून टाका – आयुक्त

February 29, 2012 10:07 AM0 commentsViews:

29 फेब्रुवारी

मुंबईतल्या गिरण्यांचे अवशेष पाडून टाका, किंवा पेस्ट कंट्रोल करा असे आदेश आयुक्त सुबोध कुमार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुंबईतल्या एनटीसी (NTC) च्या अंतर्गत ज्या सह गिरण्या बंद आहेत त्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होतेय. यामुळे मुंबईत मलेरिया वाढतोय. त्यामुळे केंद्रीय बांधकाम विभाग आणि एनटीसीनं या गिरण्यांच्या जागांमध्ये पेस्ट कंट्रोल करण्याच्या सूचना आयुक्त सुबोधकुमार यांनी दिले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिली. पेस्ट कंट्रोल करण्यासाठी येणारा खर्च एनटीसी आणि केंद्रीय बांधकाम विभागाने वाटून घ्यावा आणि ते शक्य नसेल तर हे अवशेष पाडून टाकावेत अशा सूचना देण्यात आल्या आहे.

close