भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रगती दर निचांकी पातळीवर

February 29, 2012 10:17 AM0 commentsViews: 5

29 फेब्रुवारी

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर गेल्या अडीच वर्षातल्या सगळ्यात खालच्या पातळीला गेला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतल्या 6.9 टक्क्यांवरून प्रगतीचा दर 6.1 टक्क्यांवर आला आहे. सगळ्यात जास्त घसरण कृषी उत्पादनाच्या दरामध्ये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 11 टक्क्यांवर होता तो आता 2.7 टक्क्यांवर आला आहे. इंडस्ट्रीच्या प्रगती दरातही घसरण आहे. हा दर गेल्यावर्षीच्या 7.6 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर आला आहे. फक्त दिलासा आहे तो सर्व्हिस सेक्टरच्या प्रगतीमध्ये. हा दर एका टक्क्याने वाढून आता 9 टक्के झाला आहे.

close