नाशिकमध्ये महापौरपदाचा उमेदवार भाजपचा – उध्दव ठाकरे

February 29, 2012 11:27 AM0 commentsViews: 4

29 फेब्रुवारी

नाशिकमध्ये महापौरपदाचा उमेदवार भाजपचाच असेल असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसे आदेश देऊन त्यांनी शिवसेनेचा या उमेदवाराला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेची नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. नाशिकमध्ये महापौर हा महायुतीचाच असेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुलगंटीवार यांनी केला होता. आता उध्दव ठाकरे यांच्या आदेशामुळे भाजपच्या महापौराचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्याही पुढे बहुमत सिध्द करण्यासाठी खरी कसोटी अजून बाकी आहे. यासाठी महायुती कोणती खेळी खेळते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

close