बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणी आयोगानी मागवला अहवाल

February 29, 2012 10:34 AM0 commentsViews: 2

29 फेब्रुवारी

नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये बनावट ओळखपत्रांचा वापर झाल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत नाशिकचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून आयोगाने माहिती मागवली आहे. शहरातील मतदार यादीमध्ये परिसरातील इतर गावातील नावं घुसवण्यात आल्याचा अंदाज निवडणूक आयोगाच्या बैठकीत पुढे आला. याप्रकरणाची चौकशी करून 7 फेब्रुवारींपर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार्‍या सर्वपक्षीयकार्यकर्त्यांनी काही बनावट पॅनकार्डसुद्धा माध्यमांपुढे मांडली. या पॅनकार्डच्या आधारेही मतदान झाल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.

close