मनसेच्या सहा विभागध्यक्षांचे राजीनामे

February 29, 2012 11:46 AM0 commentsViews: 5

29 फेब्रुवारी

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळालं असलं तरी दक्षिण मुंबईत मात्र मनसेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेत दक्षिण मुंबईतल्या मनसेच्या 6 विभाग अध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अरविंद गावडे, संजय नाईक, धनराज नाईक, भूपेन जोशी, शरीफ देशमुख आणि रवी चव्हाण अशी या विभागअध्यक्षांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी या पराभवाची जबाबदारी घेत गटनेतेपदाचा राजीनामा राज ठाकरेंकडे सोपवला आहे. पण राज ठाकरेंनी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही.

close