अखेर पुण्यात महायुती तुटली ; मनसे विरोधी बाकावर ?

February 29, 2012 12:01 PM0 commentsViews: 2

29 फेब्रुवारी

महापालिकांच्या निवडणुकीपासून पुण्यात महायुती चाललेली धुसफूस अखेर संपली. महायुतीने स्वतंत्र चुली मांडण्याची निर्णय घेतला आहे.भाजप, सेना, रिपाइं महायुती म्हणून पालिकेत एकत्र बसणार नाही असं आज जाहीर करण्यात आलं. निवडणुकीच्या अगोदरपासूनच जागावाटप ते प्रचारापर्यंत महायुतीत वाद सुरुच होते.याचे परिणाम युतीच्या मतांवरही दिसून आले. यामुळे अखेर आज महायुती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. महायुती म्हणून त्यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. पण नंतर मात्र स्वतंत्र चुली मांडायला निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे मनसेला विरोधी पक्षपदाचा मार्ग मोकळा होणार आहे.

close