कृपांवर कारवाईबाबत काँग्रेस कन्फ्यूज

February 29, 2012 12:30 PM0 commentsViews: 4

29 फेब्रुवारी

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी काल रात्री खार येथील निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर कृपाशंकर सिंह यांची अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धावाधाव सुरु आहे. मंगळवारीच कृपाशंकर सिंह मुंबईबाहेर गेल्याचं समजतंय. दरम्यान, कृपाशंकर सिंह प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशावर याचिकाकर्ते संजय तिवारी यांनी कॅव्हेट दाखल केला आहे. त्यामुळे आपल्याविरोधातल्या निर्णयाला कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यास सुप्रीम कोर्टाला संजय तिवारी यांची बाजू ऐकून घेऊनच निर्णय द्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे कृपाशंकर यांच्यावर पक्षीय कारवाई करायची की नाही याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरु असल्याचं मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. तसेच ही चौकशी निपक्षपातीपणे होईल, त्यात काँग्रेस ढवळाढवळ करणार नाही असं माणिकराव ठाकरेंनी सांगितले.

कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात कोणते गुन्हे दाखल ?

- प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट – 13(1) डी सरकारी नोकराने ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करणे आणि 13(1) ई ज्ञात उत्पन्ना पेक्षा जास्त ंसपती गोळा केल्या बाबत शिक्षा त्याच प्रमाणे कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात आयपीसी नुसार ही कारवाई होणार आहे. 120यात सात वर्षपर्यत शिक्षेची तरतूद आहे.- 409 सरकारी नोकराने विश्‍वासघात करणे – शिक्षा सात वर्षं – 471 खोटी कागदपत्राचा वापर करणे – शिक्षा सात वर्ष – 420 फसवणूक करणे – शिक्षा सात वर्ष- 468 खोटी कागदपत्राचा वापर करुन फसवणूक करणे – शिक्षा सात वर्ष – 201 पुरावा नष्ट करणे यात ही सुमारे शिक्षा तीन वर्ष आहे. कृपा शंकर यांच्या विरोधात ही सर्व कलम गंभीर स्वरुपाची आहे.

close