कोकेन प्रकरणी फरदीनवरील खटले थांबवा : कोर्ट

February 29, 2012 12:56 PM0 commentsViews: 1

29 फेब्रुवारी

कोकेन प्रकरणी अभिनेता फरदीन खानला याला दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने फरदीनला या खटल्यात माफी देत त्याच्याविरुध्दचा खटला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. फरदीनंने सरकारी व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत असल्याचे कोर्टाला सांगितलं होते. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतलाय. मात्र फरदीन खान याच गुन्हात परत दोषी आढळल्यास कोर्टाची माफी मागे घेण्यात येईल असं कोर्टाने स्पष्ट केलं. 2001 मध्ये नासिक अब्दुल करीम याच्याकडून कोकोन खरेदी करत असताना नार्कोटिक्स ब्युरोने दोघांना अटक केली होती. नंतर कोकेन विक्रीचा आरोप निश्चित झालेत.

close