‘बिग बॉस’ शेवटच्या टप्प्यात

November 22, 2008 7:06 AM0 commentsViews: 13

22 नोव्हेंबर'बिग बॉस सिझन टू' आता अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहचलाय. गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा शो सुरू आहे . दर वेळी नवे कारनामे करणारे स्पर्धक आणि त्यामुळे निर्माण होणारी भांडणं माजा, मस्ती असा सगळा इमोशनल माल मसाला आपल्याला बरेच दिवस टीव्हीवर पाहता आला. सरते शेवटी राजा , आशुतोष आणि झुल्फी हे तीन फायनलीस्ट उरले आहेत. आता त्या तिघांपैकी कोण जिंकणार, हे आज रात्री आपल्याला पाहता येईल. आजच्या ग्राँड फिनालेला बीग बॉस सिझन वन चे स्पर्धक राखी सावंत आणि राम किशन हे त्यांच्या परफॉरमन्सने अधिक चांगला बनवतील. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्यात पोहचल्यावर स्पर्धकांचं पळून जाणं हा कदाचीत टी . आर पी. वाढवण्याचा फंडा आहे असं म्हणता येईल, असो काहीही असलं तरी तिघांपैकी कोण बाजी मारणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे.

close