नाशिक महापौरपदासाठी यंदा तिरंगी लढत ?

February 29, 2012 2:10 PM0 commentsViews: 3

विनोद तळेकर, मुंबई

29 फेब्रुवारी

नाशिक महापौरपदासाठी यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत महायुतीच्या विजयाची शक्यता कमी असल्याने शिवसेनेन यासाठी पुढाकार न घेता भाजपला पुढं केलं आहे. काय आहे शिवसेनेची रणनीती आणि का हवी आहे प्रत्येकाला नाशिकची सत्ता.

नाशिकमध्ये त्रिशंकू महापालिका निवडून आल्याने महापौरपदाचा सस्पेंस अजूनही कायम आहे. 12 दिवसांनंतरही अजून हा गुंता सुटत नाही. युतीकडे बहुमत नसलं, तरी ते सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्यांना मनसे किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणं कठीण असल्यानं तिरंगी लढतीची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. आणि युतीकडून महापौरपदाचा उमेदवार भाजपचा असेल, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. आपली हीच चाल नाशिकमधील आपल्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबईतही बैठक घेतली. कुणालाही बहुमत नसल्याने तिरंगी लढतीत उघड मतदान करून ज्याच्याकडे सर्वांत जास्त मतं त्याचा महापौर निवडून येऊ शकतो.

कांँग्रेस आघाडीतही काही अलबेल नाही. काही दिवसांपूर्वी मनसेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांनी आठवलेंच्या रिपाइंला महापौरपदाची ऑफर देत सेना-भाजपचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या नव्या पॅटर्नला पाठिंब्यासाठी काँग्रेस तयार नाही.

सत्ता प्रत्येकाला हवी आहे. त्यातच 2015 मध्ये नाशिकला कुंभमेळावा होणार आहे. दर 12 वर्षांनी होणार्‍या या मेळाव्यासाठी केंद्र सरकारकडून 1,500 कोटी एवढा निधी मिळण्याची शक्यता आहे. आणि यासाठीच राजकीय पक्षांचा महापालिकेवर डोळा आहे.

close